ganpati-marathi-bhajan

गणपति माझा नाचत आला  भजन

भजन :गणपति माझा नाचत आला 
लेखक :Traditional

भजन: गणपति माझा नाचत आला 

आला रे आला गणपति आला

पार्वतिच्या बाडा पायात वाडा
पार्वतिच्या बाडा तुझ्या पायात वाडा
पुष्प हारांच्या घातल्यात माडा
ताशाचा आवाज तारारारा झाला
रं गणपति माझा नाचत आला

मोदक लाडू पंगतीला घेऊ
भक्ति भावाने देवाला वाहू
गणरयाच गुणगान गाऊ
दोड़े भरुनी देवाला पाहू
गाव हा सारा रंगून गेला
रं गणपति माझा नाचत आला

वंदन माझे तुझिया पाया
धरी शिरावर कृपेची छाया
भक्ताला या दर्शन द्याया
देवाधिदेवा हे गणराया
सन थोर आनंद झाला
रं गणपति माझा नाचत आला

फटाके उड़ती चाले जयघोष
नाचाया गाया आलाय जोश
धुंदीत झारे रे बेहोश
मोहाचे सारे तोडून पाश
मजा ही येते दर वर्ष्याला
रं गणपति माझा नाचत आला

अशी तुझी ही मंगलमूर्ति
दर्शन मात्रे पावन होती
लाउन ज्योति ओवाडू वरती
आनंदाला आज आलिया भरती
सोपान करतोय लय बोलबाला
रं गणपति माझा नाचत आला