“विठू माऊली तू माऊली जगाची” हे गाणे जगदीश खेबुडकर यांनी लिहिले आहे आणि ते अरे संसार संसार (१९८१) या मराठी चित्रपटात आहे, ज्याचे संगीत अनिल-अरुण यांनी दिले आहे आणि सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायले आहे.

विठू माऊली तू माऊली जगाची
भजन : | विठू माऊली तू माऊली जगाची |
गीतकार : | जगदीश खेबुडकर, |
संगीतकार : | अनिल-अरुण, |
गायक : | सुधीर फडके – सुरेश वाडकर- जयवंत कुलकर्णी, |
भजन : विठू माऊली तू माऊली जगाची
विठू माऊली तू माऊली जगाची
माऊलीच मूर्ती विठ्ठलाची,
विठ्ठला मायबापा || धृ ||
काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा…..,
अभंगाला जोड टाळ चीपल्याची
माऊलीच मूर्ती विठ्ठलाची … || १ ||
लेकरांची सेवा केलीस तू आई
आ आ आ लेकरांची सेवा…..
कस पांग फेडू आता कस उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळूनी जीव माझा सावळे विठ्ठाई
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलाची
माऊलीच मूर्ती विठ्ठलाची … || २ ||
पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू माऊली जगाची
माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ||